स्टोरी

१९८० च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून आरपीडीला सीसीटीव्ही बसवण्याकरिता आर्थिक सहकार्य.!

Spread the love

सावंतवाडी: येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या १९८० च्या एसएससी बॅच ने  हायस्कूलच्या सुरक्षेसाठी हायस्कूल प्रशासनाला सीसीटीव्ही बसवण्याकरिता पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्हि बी.नाईक यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड आदी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी उमाकांत वारंग, राजन नवार, सुरेश राऊळ, सुनील साळगावकर, परशुराम ठाकूर, सुरेश चव्हाण, राजन पिळणकर, अनिरुध्द पटवर्धन, शेखर पेडणेकर, वनिता रेडकर, सुरेखा कुडतरकर, निता कुडतरकर, वंदना कुडतरकर, उषा सावंत, व तनुजा भोसले असे सर्व मिळून 15 जण उपस्थित होते. यावेळी दिलीप नार्वेकर व महेश आरोलकर यांची उणीव भासली.यावेळी जमलेल्या रकमेपैकी ५०००० रुपये  शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा साठी माजी मुख्याध्यापक व्ही. बी. नाईक यांच्याकडे माजी विद्यार्थी तथा माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


Spread the love

Related posts

कल्याण पूर्वेतील डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती येणार!

news

पुणे येथील ५ व्‍या मानाच्‍या ‘केसरी वाडा’ गणपति बाप्‍पाचे आगमन !

news

मसूरे येथील गणेश सजावट स्पर्धेत राम बागवे प्रथम…

news

Leave a Comment