स्टोरी

अनधिकृत बांधकामाची तक्रार करणाऱ्या महिला तक्रारदाराचे अख्खे कुटूंब वेठीस धरण्याचा कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार!

Spread the love

प्रभाग ९ आय अंतर्गत विघ्नहर्ता सोसायटीने तक्रारदाराच्या दारासमोर उभी केली अनधिकृत भिंत!

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या श्री .मलंग रोडवरील विघ्नहर्ता गृह संकुलात सोसायटीने वाहन तळावर अनधिकृत बांधकाम केले आहे, या बांधकामामुळे वाहन पार्कींगला अडथळा निर्माण होवून भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल याचा विचार करून तळ मजल्या वर रहाणाऱ्या सौ .अक्षदा अशोक गायकवाड या अल्पसंख्यांक वर्गातील महिलेने प्रभाग ९ आय तसेच पालिका आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती, तरी सुद्धा हे अनधिकृत बांधकाम कसल्याही अडथळ्याविणा पूर्णत्वात नेण्यात येवून त्याचा वापरही सुरु करण्यात आला . या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याहेतू गायकवाड कुटूंबाने ८ मे रोजी पालिका मुख्यालयासमोर लाक्षणीक उपोषण केले होते . या उपोषणाला अनेक प्राप्तिष्ठीत मान्यवरांनी उपस्थिती दर्शवन उपोषणाला पाठींबा दिला होता . या तक्रारीची दखल घेण्यात यावी या साठी सौ अक्षदा गायकवाड यांनी प्रभाग ९ आय कार्यालयाविरोधात आयुक्तांच्या लोकशाही दिना साठीही तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जाची सुनावणी लोकशाही दिनात होणार आहे. याच गोष्टीची दखल घेत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त श्री सुधाकर जगताप यांनी प्रभाग ९ आय च्या सहाय्यक आयुक्त सौ .हेमा मुंबरकर यांना या प्रकरणी दोन्ही पक्षकारांची सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार सोसायटीने केलेले अनधिकृत बांधकाम एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी स्तलांतरीत करण्याचे काम सोसायटीने हाती घेतले आहे. त्याच बरोबर सुडबुद्धी पोटी आणि केवळ मात्र तक्रारदाराच्या पुर्ण कुटूंबियांना त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रारदाराच्या दारापासुन केवळ ३ ते ४ फुट अंतरावर तळापासुन सिलींग पर्यंत उंचच उंच पक्की भिंत बांधून तक्रारदाराच्या दारा समोर जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला आहे या अनधिकृत भिंती मुळे तक्रारदाराच्या घरात जाणारा उजेड आणि वारा बंद झाला आहे . ही अनधिकृत भिंत बांधण्यासाठी संबंधीत पालिका आधिकाऱ्याची मौखिक परवानगी असल्याचे तक्रारदारा कडून समजते. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या सुडबुद्धी पोटी तक्रारदाराच्याच दारात बांधण्यात आलेल्या या अनधिकृत भिंतीमुळे एका अलसंख्यांक कुटुंबाला वेठीस धरल्याच्या या निंदनीय प्रकाराच्या चर्चेला कल्याण पूर्वैत उधाण आले आहे .


Spread the love

Related posts

जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

news

सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन तर्फे रानभाज्या पाककला प्रदर्शन व स्पर्धा चे आयोजन!

news

अवैध व्‍यवसायांमध्‍ये कुणालाही पाठीशी घालणार नाही! उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

Leave a Comment