स्टोरी

‘अंनिस’ला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे खुले आव्हान !

Spread the love

पुणे येथे सत्संग आणि दिव्य दरबार कार्यक्रम !

पुणे: पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्‍वर धाम सरकार यांच्या पुण्यात होणार्‍या सत्संग आणि दिव्य दरबार कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महाराष्ट्र अंनिस) विरोध केला होता. त्यावर २० नोव्हेंबर या दिवशी बागेश्‍वर बाबा यांनी समितीला खुले आव्हान दिले. ते म्हणाले, ‘माझ्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. आपण ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करू, एकदाच आमने-सामने होऊन जाऊ द्या’, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. तसेच ‘भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी राज्यघटनेत पालट केला पाहिजे’, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा २० नोव्हेंबरपासून शहरातील संगमवाडी येथे ३ दिवसांचा सत्संग चालू आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शास्त्री पुढे म्हणाले की, सत्संगामध्ये बोलत असतांना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्याप्रमाणे कोण कोणता शब्द घेतो ? त्यावरून त्याची भूमिका ठरते. मी कधीही रावणाशी भ्रमणभाषवर बोललेलो नाही; पण कथा सांगतांना उदाहरण म्हणून दृष्टांत दिला जातो. त्या अर्थाने मी बोललो आहे. तसेच आजार बरे करण्यासाठी रुग्णालयात गेलेच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही आक्षेप असतील, तर त्यांनी माझ्या दरबारात यावे, त्यांना कुणीही अडवणार नाही.


Spread the love

Related posts

कुणकेरी येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..! केतन सावंत

news

अमोल भगत यांची यूकेच्या संडरलँड शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलच्या १०व्या आवृत्तीमध्ये सन्माननीय ज्युरी सदस्य म्हणून नियुक्ती.

news

सातुळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम…! सातुळी स्वराज्य ग्रुप व ग्रामस्थांचे आयोजन .

news

Leave a Comment