स्टोरी

सावंतवाडीत देशभक्त गव्हाणकर महाविद्यालयात उद्या ५ फेब्रुवारी रोजी उडान महोत्सवाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी (श्रीरंग जोसोलकर): मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्ट संचालित देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात ५ फेब्रुवारी उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार आहे. या कॉलेजला यंदाचे यजमान पद देण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ बळीराम गायकवाड, समन्वयक डॉ. कुणाल जाधव पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, संस्थेचे संचालकसचिन मांजरेकर, तरुण भारतचे पत्रकार अॅड. संतोष सावंत, लोकमान्य टस्ट सिनीयर एक्सिकेटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर आदी उपस्थित राहणार आहेत या उडान महोत्सवात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यातून सुमारे १७ महाविद्यालय सहभागी होणार आहेत. यापूर्वी या कॉलेजमध्ये उडान महोत्सवाच्या आयोजन उत्कृष्टपणे केले होते. त्यामुळे यंदा हा उडान महोत्सव रंगतदार होणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य यशोधन गवस यांनी केले आहे. ह्या महोत्सवात पथनाट्य व पोस्टर मेकिंग व वक्तृत्व स्पर्धा अशा जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहेत.


Spread the love

Related posts

४५ ते ६० वयोगटातील अविवाहहीतांना मिळणार पेन्शन!

news

कलंबिस्त हायस्कूल येथे सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन….!

news

मनसे विद्यार्थी सेनेचा एस पी के कॉलेज ला ७ दिवसाचा अल्टीमेटम .

news

Leave a Comment