स्पोर्ट

विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम..! राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक पटकावला.

कु. हेमांगी मेस्त्री हिची आता राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. हेमांगी मेस्त्री ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिच्या उज्वल यशाबद्दल तिचे कोच मंगेश घोगळे तसेच श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

मालवण केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न.

news

सिंधू रनर टीम धावली शिरोडा (गोवा) ते सावंतवाडी १०० किलोमीटर इंटरसिटी रन.

news

तेजस्विनी विरेंद्र आचरेकर ह्यांची राष्ट्रिय तायक्वांडो कॅडेट स्पर्धा महाराष्ट्र संघ प्रशिक्षकपदी निवड!

news

Leave a Comment