स्टोरी

पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता !

Spread the love

जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश  जालना जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक आर्. सी. शेख यांनी दिला होता, अशी माहिती आसाराम डोंगरे यांनी केलेल्या माहिती अधिकारात प्राप्त झाली. २३ ऑगस्ट या दिवशी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षमायाचना केली होती. लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्‍यांवर लाठीमार करण्‍याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला. त्‍या ठिकाणी कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी हा निर्णय घेणे आवश्‍यक होते. हे दोन्‍ही अधिकारी तेथे स्‍वत: उपस्‍थित होते, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) ज्ञानेश्‍वर चव्‍हाण यांनी दिली होती.


Spread the love

Related posts

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी केली मतदान करण्यासाठी गर्दी

news

सावंतवाडीत गॅस सिलेंडर वितरणात मनमानी ? घरपोच सेवेशिवायच शुल्क वसुली; ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी.

निराधार जख्मी बांधवांवर प्रथमोपचार सेवा करताना आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो…! संदिप परब,अध्यक्ष -जीवन आनंद संस्था.

news

Leave a Comment