स्टोरी

महाराष्ट्र शासनाने आपले सरकार या संकेतस्थळा विषयी नागरिकांची अप्रसन्नता

Spread the love

सावंतवाडी: महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या तक्रारीचा त्वरित निपटारा व्हावा म्हणून मंत्रालयीन स्तरावर आपले सरकार या संकेत स्थळाची निर्मिती केली. तसेच काही शंका असल्यात संपर्क क्रमांक दिला आहे या क्रमांकाशी संपर्क साधला असता सादर क्रमांक अस्थित्वात नाही किंवा इतर जाहिरातीची माहिती दिली जाते, महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा मास राबविण्यात आला होता. त्याचे औचित्त साधून सावंतवाडी शहरातील २ जेष्ठ नागरिकांनी आपले सरकार या संकेतस्थळावर एक राज्य स्थरीय आणि एक स्थानिक समस्या याविषयी संगणकीय प्राणालीद्वारे विनंती अर्ज सादर केले. हि तक्रार पोर्टलवर आपली तक्रार यशस्वी पणे नोंदविण्यात आल्याची पोच पावती देण्यात आली. या पावतीवर तालुका प्रशासन स्तर , भ्रमणभाष , मेल आयडी , तक्रारींचे स्वरूप जोडलेले कागद , अशी नोंद असलेली पावती देण्यात आली या पावतीवर काही शंका असल्यास किंवा तक्रार निवारण झाली नाही तर ०२२- ४०२९३००० या क्रमांकाशी संपर्क करा. असे नमूद केले, तक्रारदारांना १५ दिवस होऊनही तक्रारदारांनी दिलेली इमेल आयडीवर शासनाने तक्रार निवारण विषयी काही माहिती आली नाही म्हणून पावतीवर दिलेल्या संपर्क क्रमांकाशी संपर्क साधला असता सदर क्रमांक अस्थित्वात नसल्याची धुंद ऐकायला मिळते, या संपर्क क्रमांक याविषयी संभ्रम असून आपले सरकार या पोर्टल विषयी संभ्रम असून तक्रारदार पुन्हा या विषयी तक्रार करत आहेत.


Spread the love

Related posts

चकमक तज्ञ दया नायक पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत रुजू!

news

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा!

news

चांदोशी येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले संस्काराचे धडे…!

news

Leave a Comment