स्टोरी

चांदोशी येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले संस्काराचे धडे…!

Spread the love

मिठबाव प्रतिनिधी: चांदोशी येथील श्री भवानी मंगल कार्यालय येथे नुकतेच तीन दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर पार पडले. सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प देवगड यांनी सदर व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसीय निवासी शिबिरात देवगड तालुक्यातील १८ जि. प. शाळांतील ८८ मुली व ५६ मुलगे असे एकूण १४४ शिबिरार्थी पूर्णवेळ सहभागी झाले होते.

या शिबिरामध्ये विज्ञान व राष्ट्रभक्ती या विषयांवर ९ बौद्धिक सत्रे व ४ शारीरिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात भारतमाता पूजनाचा विशेष लक्षवेधी कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. श्री. किरण हिंदळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात श्री. आनंद राजम, शिबीर कार्यवाह, श्री. सुरेंद्र शर्मा, संघटन मंत्री, सेवा भारती कोकण प्रांत, आणि श्री. हेमंतजी आईर प्रयोगशाळा विषय प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत हे पूर्णवेळ उपस्थित होते. या शिबिराला श्री. विलास तावडे, मा. अध्यक्ष, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. धनंजय जठार, शिक्षण आयाम प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. महेशजी कानेटकर, कार्यवाह, रा.स्व.संघ, देवगड तालुका, अॅड. श्री. अजितराव गोगटे, माजी उपाध्यक्ष रा.स्व. संघ जनकल्याण समिती, कोकण संभाग यांनी भेट दिली. तसेच ४९ पालक, शिक्षक, हितचिंतक, देणगीदार यांनी सदिच्छा भेट दिली.

हे यशस्वी पार पडण्यासाठी प्रयोगशाळा प्रकल्पाचे २७ माजी विद्यार्थी, प्रकल्प समिती सदस्य, जिल्हा समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Related posts

राष्ट्रध्वज घेऊन घरोघरी फडकवावा! डाकघर अधीक्षक मयुरेश कोले.

news

निधी केळुसकर आणि अर्शीन शेख ठरल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार..! कुडाळच्या चिमणी पाखर संस्थेचं आयोजन 

news

परब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा!

news

Leave a Comment