स्टोरी

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया! मुख्यमंत्री शिंदे

Spread the love

३० सप्टेंबर वार्ता: उद्या रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी 1 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की,  ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-2 चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


Spread the love

Related posts

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

news

एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा ..

news

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर!

news

Leave a Comment