स्टोरी

जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा

Spread the love

मालवण: भारत पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सिंधुदुर्ग येथे जागतिक पर्यटन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आणि एसआरएम कॉलेज कुडाळ येथील नव्याने स्थापन झालेल्या युवा टुरिझम क्लब च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

 

कार्यक्रमास प्रमुख अथिति म्हणून भारत पर्यटन विभाग सहसंचालक सौ. भावना शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली स्थानिक किल्ला रहिवासी नागरिक श्री पाडावे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ले चा गौरवशाली इतिहासाची महती सर्व उपस्थितांना दिली तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भग्न झालेल्या राजवाडा, राजदरबार अन्य पुरातत्व विषय पुनर्जीवित होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न्न होण्यासाठी आवाहन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 

युवा टुरिझमच्या नोंदणी झालेल्या विद्यार्थीनी आपला परिसर आपले कल्चर जपून पर्यटन आणि पर्यावरण यांचे समतोल राखून पर्यटन विकास करावा. यांचे मार्गदर्शन पर्यटन सहसंचालक सौ भावना शिंदे यांनी केले तसेच त्यांच्या हस्ते 400 पेक्षा जास्त होम स्टे धारकांना त्यांचा व्यवसाय वाढ होण्यासाठी व येणाऱ्या पर्यटकांना होम स्टे धारकांना थेट संपर्क साधून राष्ट्रीय व आतंराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी

ttdskokan.com ह्या वेबपोर्टल चे टी टी डी एस अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर यांच्या उपस्थितीत उदघाट्न करण्यात आले.

 

केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार सर्व शाळा कॉलेजमध्ये युवा टुरिझम क्लब ची स्थापना करण्यात येत आहे. या क्लबच्या माध्यमातून तरुण युवक युवती मध्ये पर्यटन व्यवसाय संस्कृती वारसा विषयक जागरुकता निर्माण व्हावी. पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावं. हा मुख्य हेतू ठेऊन यंदाचा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याची भूमिका पर्यटन व्यावसायिक महासंघाची असल्याचे अध्यक्ष विष्णू मोडकर यांनी सांगितले. पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष 2023 चि जागतिक थीम असुन या थीम अनुसरून या वर्षीचा 27 सप्टेंबर 23 जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला. यावेळी पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन तसेच किल्ला परिसर क्लीन एण्ड ड्राइव मोहिम राबविण्यात आली.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या किल्ले सिधुदुर्ग वर मंदिर नूतनीकरण तसेच किल्याची डागडुजी,एैतिहासिक विहीर, नष्ट झालेल्या पुरातन वास्तू पुनर्जिवकरणासाठी भरीव निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने उपलब्ध करावा अशी मागणी श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाने भारत पर्यटन मंत्रालय अधिकारी भावना शिंदे यांच्या कडे केली.


Spread the love

Related posts

वेंगुर्ले तुळसमध्ये आढळला अतिदुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप

news

कस्तुरबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन राजाराम गवस यांना राष्ट्रपती पोलीस पदकांने सन्मानित….!

news

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मसूरे, पोईप, विरण येथे पोलीस संचलन!

news

Leave a Comment