स्टोरी

देशाच्या वित्तीय प्रणालीमध्ये १ लाख कोटी रुपये बेवारस….

Spread the love

७ सप्टेंबर वार्ता: देशाच्या सर्व प्रकारच्या वित्तीय प्रणालीमध्ये १ लाख कोटी रुपये बेवारस पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हि माहिती स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

 

बँकांचा विचार केला तर देशातील सर्व बँका मिळून एकूण ३५ हजार कोटी रुपये बेवारस पडलेले आहेत. या पैशांवर कुणीही दावा केलेला नाही आणि त्याचे मुख्य कारण नॉमिनी आहे. हा पैसा ज्यांचा आहे त्यांनी बँकांमध्ये पैसा जमा करताना उत्तराधिकारीच नेमला नाही. पण, हा पैसा ज्यांचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार गंभीर असल्याचे अर्थ्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होत्या. हा पैसा सरकारलाही वापरता येत नाही आणि कुणाला देताही येत नाही. त्यामुळे त्याचा उत्तराधिकारी शोधण्याशिवाय पर्याय नाही.

अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये यासाठी सर्व खातेदारांकडून नॉमिनी अर्थात उत्तराधिकारी निश्चित करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. बँकांमधील मुदत ठेवी बेवारस पडून आहेत. हा पैसा मूळ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मोहीम राबविली होती. त्यासाठी उद्गम पोर्टलही सुरू केले होते. बँकेतील खाते असो वा म्युच्युअल फंड असो वा आणखी कोणत्या बँकींग प्रणालातीली ठेवी असो, यापुढे उत्तराधिकारी नमूद करणे अनिवार्य असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 


Spread the love

Related posts

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ मंजूर.

news

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाले गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश…!

news

सावंतवाडी – टर्मिनसचा प्रश्न काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी १६ वर्षे तिष्ठत ठेवला…! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

news

Leave a Comment