स्टोरी

लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’च्या चर्चा सुरु असतांनाच कुंभमेळ्यातून प्रसिद्धीस आलेली मोनालिसा भोसले आणि फरमान खान अडकले विवाहबंधनात.

Spread the love

मुंबई: ​कुंभमेळ्याच्या काळात रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धीस आलेली मोनालिसा भोसले आता पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहे. माध्यमांच्या केंद्रस्थानी आली आहे. आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जात मोनालिसा हिने तिचा मुस्लिम प्रियकर फरमान खान याच्यासोबत लग्न केले आहे. मात्र, या लग्नानंतर एका मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. मोनालिसा ला रुपेरी पडद्यावर झाळकवणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचे असल्याचे वळण दिले आहे. तसेच ती अद्याप अल्पवयीन असल्याची जोरदार चर्चाही सर्वत्र सूरू लागली.

याबाबत मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खान यांनी एकत्र येत अधिकृतरीत्या एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.​ या पत्रकार परिषदेदरम्यान मोनालिसा हिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांचा विवाह हा पूर्णपणे हिंदू रितीरिवाजांनुसार संपन्न झाला आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, फरमान ची तिच्याशी विवाह करण्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु तिनेच स्वतःहून आग्रहाने आणि मर्जीने त्याला या लग्नासाठी तयार केले. यामागचे मुख्य कारण सांगताना ती म्हणाली की, तिच्या वडिलांचा या विवाहास सक्त विरोध होता. त्यांना तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलासोबत लावून द्यायचे होते. परंतु, नात्यात आत्याचा मुलगा हा भावासारखा लागत असल्याने तिने या विवाहास ठामपणे नकार दिला. तिने पुढे अशीही माहिती दिली की, तिचे वडील तिच्यासोबतच आले असून ते अजूनही तिथेच उपस्थित आहेत. त्यांना या लग्नाची पूर्ण माहिती आहे, परंतु ते खूप नाराज असल्याकारणाने या विवाहसोहळ्याला त्यांनी हजेरी लावली नाही.​लव्ह जिहाद च्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्टपणे बोलताना मोनालिसा ने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. “लोकांकडून जे लव्ह जिहादचे आरोप लावले जात आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. आम्ही दोघेही कलेच्या क्षेत्रातील कलाकार आहोत आणि आमच्यासाठी कोणताही धर्म वेगळा नाही, सर्व धर्म एकसमान आहेत. मी सर्वच धर्मांना तितकेच मानते,” असे ती म्हणाली. याच वेळी फरमान खान यानेही धर्मांतराच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने स्पष्ट केले की, “लग्नानंतरही ती आजही हिंदू धर्मातच असून ती तिच्या धर्माचे पालन करते, आणि मी माझ्या मुस्लिम धर्मातच आहे.”​पत्रकाराचे मत:दोन सज्ञान व्यक्तींना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याला अनावश्यक धार्मिक रंग देऊन समाजाचे लक्ष विचलित करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.​

महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही बांधिल आहोत. तरीही कळत नकळत एखाद्या बातमीत चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती व्हाट्सअप करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास कृपया संपर्क साधा. संपर्क क्रमांक:- 9209391117


Spread the love

Related posts

कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांमुळे दोन गटात वाद!

news

कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..! 

news

प्रभाग ९ आय अंतर्गत विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम!लेखी तक्रारी नंतरही अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष!

news

Leave a Comment