स्टोरी

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा होणार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिन साजरा होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी होणार आहे दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे .या कार्यक्रमासाठी दोन प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे .महिलांसाठी पाककला स्पर्धा व दुसरा विषय कर्तबगार महिला वेशभूषा स्पर्धां चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी सावंतवाडीच्या नूतन सभापती सन्माननीय सुश्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक व सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी परब मॅडम तसेच महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा तेजस्विता वेंगुर्लेकर व जिल्हा सचिव माळी मॅडम, आणि जिल्हा कार्यकारणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री म ल देसाई सर, राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, महिला राज्य संघटक वंदना सावंत या उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी व सचिव महेश पालव हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाच आपण आस्वाद घ्यावा. ही विनंती आहे. असे आवाहन महिला सेलच्या तालुकाध्यक्ष शुभेच्छा सावंत व तालुका सरचिटणीस रोशनी राऊत व तालुका अध्यक्ष विजय गावडे व सचिव रुपेश परब व सर्व तालूका कार्यकारिणीने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वांना केलेले आहे .


Spread the love

Related posts

शेतकऱ्यांना फक्त शेंडी लावण्याचे काम सरकार करत आहे! संदीप जगताप

news

अखेर असनिये गावांमध्ये बस सेवा सुरू…! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ग्रामस्थांनी मानले आभार.

news

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी परवानगी!

news

Leave a Comment