स्टोरी

जानवलीतील येथील अपघातात वागदेतील तरुण जागीच ठार! रात्री 10.45 वाजता घडला अपघात

Spread the love

 

 

 

कणकवली: जानवलीहून वागदेच्या दिशेने जात असताना महामार्गावर मनोहर शिल्प बिल्डिंग समोर वागदेतील तरुणाच्या दुचाकीचा अपघात होत दुचाकी स्वार गणेश काणेकर जागीच ठार झाला. गणेश हा जानवली हुन वागदेच्या दिशेने दुचाकी ने जात होता. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी स्पष्ट झाले नसले, तरी ज्या ठिकाणी दुचाकीवरून गणेश रस्त्यावर पडला तिथून त्याची दुचाकी काही अंतरावर जाऊ पडली होती. त्या मुळे तो वेगाने असण्याची शक्यता पोलीसानी वर्तवली. यात गणेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, श्री देसाई यांच्यासह अन्य स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच वागदे ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. हा अपघात आज रविवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तत्पूर्वी त्याचा मृत्यु झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष चौगुले यांच्यासह कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर  केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाची कारवाई.

news

शिवानी प्रकाशन मुंबई चा वर्धापन दिन मुंबई सायन येथे उत्साहात संपन्न! सिंधू पुत्र समाजसेवक संतोष महाडेश्वर यांचा अनोखा उपक्रम….

news

हरकुळ बुद्रुक येते रात्री गव्याचा वावर! कोटेश्वर शाळेच्या नजिक रात्री ११ च्या सुमारास गव्याचे दर्शन

news

Leave a Comment