स्टोरी

पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर  केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाची कारवाई.

Spread the love

२५ सप्टेंबर वार्ता: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर  केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आज पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावरील कारवाई झाले. असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारला असता, ते म्हणाले की, “पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या. त्यांच्या यात्रेला मोठा पाठिंबा व लोकांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं”, असं म्हणत बच्चू कडूं यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यातदेखील छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने केंद्र सरकारचा 19 कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारीच यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. याबाबत वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशीही सुरु होती. मात्र या धाडीमुळं पंकजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


Spread the love

Related posts

मडगाव ‘एक्सप्रेस’च्या स्वयंपाकघरात उंदरांचा सुळसुळाट !

news

रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर!

news

श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन..!

प्रसाद परब

Leave a Comment