स्टोरी

तळाशिलातील बांधऱ्याचे काम योग्य रीतीने चालू! तळाशिल ग्रामस्थ

Spread the love

मालवण (आचरा): दोन दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तळाशील जात घालण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी करत बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगत आमदार वैभव नाईक हेच त्याला जबाबदार असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी तळाशिल ग्रामस्थांनी फसवणूक केली असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर तळाशिल ग्रामस्थांनी श्रीकृष्ण मंदिर येथे बैठक घेत त्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. तळाशिल हे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील आहे आणि या भागाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकअसणाऱ्या बांधाऱ्याची कामे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून योग्य पद्धतीने चालू असताना काहीजण राजकीय स्वार्थासाठी ग्रामस्थांकडून कोणतीही माहिती न घेता करत असलेल्या खोटी विधाने करत दिशाभूल करत आहेत. असे सांगत तळाशिल ग्रामस्थांनी झालेल्या बैठकीत त्या विधानाचा निषेध नोंदवला.

तळाशिलातील बांधऱ्याचे काम योग्य रीतीने चालू…..बांधाऱ्यावरून करण्यात आलेल्या विधानाचा समाचार घेण्यासाठी तळाशील ग्रामस्थांनी मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली या बैठकीत बोलताना ग्रामस्थ करून म्हणाले की तळाशिलातील झालेले बंधारे हे मंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेले आहेत आज जी कामे होत आहेत ती आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून होत आहेत. आमदार नाईक यांच्या प्रयत्नांनातून घालण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट झाले आहे. तळाशिलात विविध विकासकामे आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चालू आहेत, आज कोणीतरी उठतो आणि होणाऱ्या विकासकामांबाबत आरोप करत सुटतो अशांनी अगोदर ग्रामस्थांकडून कामांबाबत माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत.


Spread the love

Related posts

खोत जुवा येथे ५ मे रोजी २०-२० भजन डबलबारी.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पंधरावडा निमित्त विविध स्पर्धा संपन्न.

news

मालवण बार्शी बसचा भिषण अपघात!

news

Leave a Comment