स्टोरी

महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे ! शरद पवार

Spread the love

३ ऑगस्ट वार्ता: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात वयाच्या ८१ व्या वर्षी आज सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या औरंगाबाद येथील पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी ट्वीट करत ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली असून, दुःख व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.”, असे पवार म्हणाले.


Spread the love

Related posts

राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा लवकरच तयार करणार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

राज्‍यातील सर्व नागरिकांनी ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करावी! सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे आवाहन….

news

आजपासून सोलापूर येथे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या सामाजिक कीर्तनमालेस प्रारंभ!

news

Leave a Comment