स्टोरी

चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

Spread the love

१५ ऑगस्ट वार्ता: चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्राच्या अधिक निकट पोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १४ ऑगस्टच्या सकाळी ११.३० ते १२.३० या कालावधीत ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर आणखी घटवले. त्यामुळे आता चंद्रयान-३ चंद्राला किमान १५० किमी ते अधिकाधिक १७७ किमी अंतरावरून प्रदक्षिणा घालत आहे.याआधी ६ आणि ९ ऑगस्ट या दिवशी अशा प्रकारेच चंद्रयान-३ चे चंद्रापासूनचे अंतर अल्प करण्यात आले होते. २३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याचा (‘सॉफ्ट लँडिंग’चा) प्रयत्न करणार आहे. १६ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर १०० किमी करण्यात येणार असून १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे.


Spread the love

Related posts

मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु! पालकमंत्री रविंद्र चव्हाण

news

लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्वपूर्ण घोषणा.

news

देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे ज्येष्ठ नागरिक संगोपन परिचारिका प्रशिक्षण अभिनव कार्यक्रम संपन्न…..

news

Leave a Comment