स्टोरी

निसर्गकवी ना. धो. महानोर काळाच्या पडद्याआड!

Spread the love

३ ऑगस्ट वार्ता: प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार. १६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर गेली ६० हून जास्त वर्षे कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.

महानोरांचा जन्म पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली.


Spread the love

Related posts

कोकण इतिहास परिषद १३ वे राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्षपदी डॉ. वि. ल. धारूरकर…!

news

वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले नाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाचा सन्‍मान ! – उदयनराजे भोसले

news

सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या पुरस्‍काराच्‍या रकमेत दुपटीने वाढ ! – सुधीर मुनगंटीवार

news

Leave a Comment