स्टोरी

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोरिल उघड्या गटाराचे काम पूर्ण!

Spread the love

सामाजिक बांधिलकीने केली होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांना निवेदनाद्वारे विनंती….

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील उघड्या गटारावर फरशी घालण्याबाबत सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांना निवेदनाद्वारे विनंती केली होती. सामाजिक बांधिलकीच्या विनंतीला मान देऊन व वारंवार होत असलेल्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोर मुंबई गोवा हायवेच्या बाजूला उघड्या गटारांवर फरशा घालण्यात आल्या.

गेली कित्येक वर्ष ही गटारे उघडी असल्याकारणाने वारंवार ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व्यक्ती, तसेच शाळकरी मुले पडून जखमी व्हायचे त्यातील काही व्यक्तींना सामाजिक बांधणीच्या माध्यमातून औषध उपचार देखील करण्यात आले होते. आता त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सदरे यांचे आभार सामाजिक बांधिलकी कडून मान्य झाले आहे.


Spread the love

Related posts

माडखोल भगवती हॉल येथे आयोजित केलेल्या दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद….!

news

अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पुजा…!

news

महाराष्ट्रातील रुग्ण अन्य राज्यात का? प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सावंतवाडी रुग्णालय प्रकरणी आदेश सकिँट बेचचा सवाल.

प्रसाद परब

Leave a Comment