शिक्षण

हुमरस येथे रविवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर!

Spread the love

ग्रामपंचायत हुमरसचे आयोजन….

कुडाळ: उद्या रविवार दिनांक २३ जुलै रोजी हुमरस (ता. कुडाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परबवाडी क्रमांक एक येथे दहावी बारावी व पदवीनंतर देण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती व स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हुमरस ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित केले आहे. सदर शिबिरामध्ये स्पर्धा परीक्षा व दहावी बारावीनंतरचे करिअर या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून यात ‘यशस्वी भव!’ या पुस्तकाचे लेखक, नीट, जेईई, एम. एच.- सीईटी, एनडीए अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ तथा परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब

तरी सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा हुमरस पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी व कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लाभ घ्यावा व आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअरची संधी समजून घ्यावी व शिबिराला उपस्थिती द्यावी असे आवाहन हुमरस ग्रामपंचायतचे सरपंच सिताराम तेली व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा चीले हीने केले तिहेरी यश संपादन

news

तरळे ज्ञानवर्धीनी नर्सिंग काॅलेजवर विध्यार्थीनींनी केला फसवणूकीचा आरोप.

news

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश.

news

Leave a Comment