Uncategorizedशिक्षणस्टोरी

कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा

Spread the love

कणकवली | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : कणकवली तालुका वैश्य समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदा चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दहावी, बारावी तसेच डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए. आणि पीएच.डी. सारख्या उच्च शिक्षणात उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.हा उत्साही सोहळा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे संपन्न होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येईल.समाजबांधवांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून इतरांना प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश आहे.”

नोंदणी : दहावीत किमान ८०%, बारावीत किमान ७०% किंवा उच्च शिक्षणात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक सत्यप्रत व मोबाईल क्रमांकासह ५ जुलै २०२६ पूर्वी श्री. निवृत्ती धडाम यांच्या दुकानात सादर करावेत.पालक, समाजबांधव व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याला शोभा वाढवावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.


Spread the love

Related posts

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश!

news

हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी १ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे मोफत 2D इको तपासणी शिबीर!

news

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पांग्रड गावात ३८ लाखाच्या कामांचे भूमिपूजन.

news

Leave a Comment