स्टोरी

वेंगुर्ले सावंतवाडी मुख्य रस्त्यावर वाऱ्यासह झाड पडल्याने वाहतूक ठप्प!

Spread the love

वेंगुर्ले: तालुक्यात आज मध्यरात्री व पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी या मुख्य रस्त्यावर आज पहाटे ४.३० वा. आडेली खुटवळवाडी येथे आकेशियाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.सुदैवाने यावेळी एक कार अपघातातून थोडक्यात बचावली.तर स्ट्रीट लाईट पोल वाकून तारांचे नुकसान झाले आहे. सदर वाहतूक श्री देव सोमेश्वर मंदिर मार्गे वळविण्यात आली .तालुक्यात अन्य ठिकाणीही झाडे, विद्युत पोल पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे .मागील आठवड्यात याच मार्गावर जांभरमळा येथील कानू मोरजकर यांचे किराणा दुकानावर वडाचे झाड पडून मोठी नुकसानी झाली होती.या मार्गा दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे जीर्ण झाली असून रस्त्यावर व विद्युत तारांवर लोम्बकळत आहेत.याबाबत संबंधित विभागाने त्वरित लक्ष पुरवावे,अशी मागणी होत आहे.


Spread the love

Related posts

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ११२ न्यायाधिशांच्या नियुक्त्याही रहित !

news

मालवण येथे २६ मे पासून प्रवासी जल वाहतुकीबरोबरच विविध जलक्रीडा बंद राहणार!

news

मनसे मार्फत देवगड मधील अनेक विभागांत मोफत पाणी पुरवठा!

news

Leave a Comment