स्टोरी

मनसे मार्फत देवगड मधील अनेक विभागांत मोफत पाणी पुरवठा!

Spread the love

देवगड : देवगड शहरा मध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडला असुन या बाबत नागरीकांना टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत देवगड नगरपंचायतीकडे केलेली असुन देवगड नगरपंचायतीने या मागणीची पूर्तता करण्यास असमर्थता दर्शवली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष पप्पू जाधव हे देवगड कील्ला विभागातील वाॅर्ड क्र.१० मधील नागरिकांच्या हाकेला धावून आलेले असुन त्यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष सौ. मिताली सावंत यांच्या वॉर्ड क्र.१० मधील नागरीकांना स्वखर्चाने म.न.से मार्फत मोफत पाणी पुरवठा केला. पप्पू जाधव यांनी केलेल्या मदतीचे सर्व स्थानिक नागरिकांनी कौतुक करुन आभार मानले.गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत देवगड मधील अनेक विभागांत मोफत पाणी पुरवठा करण्यात येत असून म.न.सेच्या या उपक्रमाची नागरीक दखल घेत असुन आभार व्यक्त करीत आहेत.


Spread the love

Related posts

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन .

news

‘इस्लाम धर्मात जाती आहेत का?’ जरांगेंचा निवृत्त न्यायाधीशांना प्रश्न

news

राज्यस्तरीय रंगोत्सवात बांदा पानवळ शाळा सर्वोत्तम.

news

Leave a Comment