राजकारण

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Spread the love

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी निवडणूक आयोगाचा निकाल तसेच ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?….

“निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी या आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची गरज आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर ही लढाई अद्याप संपली नसल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळे आगामी महापालिका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणत्या बाजूने जाणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.


Spread the love

Related posts

शिंदे गटाने कागदपत्र सादर करण्‍यासाठी मुदत वाढवून मागितली !

news

गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीच्‍या व्‍यक्‍तींवर निवडणूक लढवण्‍याची बंदी कायमस्‍वरूपी हवी असल्‍याचा प्रस्‍ताव प्रलंबित !

news

असगणी गावचे माजी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी हाती घेतली मशाल..! आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत

news

Leave a Comment