राजकारण

संजय राऊत यांची विरोधकांवर नाव न घेता खोचून शब्दात टीका……

Spread the love

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या निर्णयानंतर शिंदे गटाला टार्गेट केलं आहे. संजय राऊत सध्या कोकण दौऱ्यावर असून ते आज कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?….

“या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता एका म्हणीचा आधार घेत त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. “समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. असे ते म्हणाले.

शिवसेना भवन

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार का? असं विचारलं असता, “निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्यांच्या ताब्यात जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती जागा शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना पक्ष आमचाच आहे. खुर्चीवर बसलेल्या काही लोकांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेची शाखा, शिवसेनेची संपत्ती आणि हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहतील”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.


Spread the love

Related posts

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री! चंद्रशेखर बावनकुळे

news

उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहूया! पंढरीनाथ मसुरकर यांचे आवाहन..!

news

आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे! राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

news

Leave a Comment