राजकारण

सायकल प्रवासातून ‘आरोग्य’ संदेश! मसुरे नं. १ शाळा पदवीधर शिक्षक विनोद सातार्डेकर यांचा आदर्शवत उपक्रम ..

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सायकल प्रवास आरोग्यासाठी नेहमीच चांगला. हा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांना, तरुणांना देत मसुरे नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक विनोद सखाराम सातार्डेकर यांनी वराडकरवाडी वायरी भूतनाथ ते मसुरे नं. १ शाळा हा सुमारे २५ किलोमीटर प्रवास सायकलने करत आगळावेगळा संदेश दिला आहे. विनोद सातार्डेकर हे आपल्या मसुरे येथील प्रशालेतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी सायकल चालवण्याचे फायदे विशद करत असतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना ते योगा, नाट्य, कला, क्रीडा, काव्य, विविध वाद्य वादन आदी प्रकारचे मोफत शिक्षण देत असतात. विनोद सातार्डेकर हे नावाजलेले कीर्तनकार असून आपल्या कीर्तनाच्या कलेतून ते समाजपयोगी सेवा आणि समाजाला संदेश नेहमी देत असतात. सातार्डेकर हे उत्कृष्ट नाट्य कलाकार तसेच उत्कृष्ट निवेदक,पखवाज वादक म्हणून सुद्धा मालवण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत.

फोटो :मसुरे नं. शाळा पदवीधर पदवीधर शिक्षक विनोद सातार्डेकर यांनी सुमारे २५किलोमीटर प्रवास सायकलने करत आरोग्य संदेश दिला.

सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे. योग आणि व्यायामाप्रमाणे सायकल चालवल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. सकाळी सायकल चालवल्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि रात्री झोपही चांगली येते असे शिक्षक विनोद सातार्डेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या उपक्रमाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे रामेश्वरी मगर, उमेश खराबी, हेमलता दुखंडे, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, स्थानिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, उपाध्यक्ष शितल मसुरकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर आदीनी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे सरकार चे मानले आभार…..

news

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आमची राजकिय दोस्ती आहे! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू याच्या अटके नंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक!

news

Leave a Comment