राजकारण

राज्यात पुन्हा एकदा होणार राजकीय महाभूकंप!

Spread the love

१० जुलै वार्ता: राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजितदादा पवारांसह बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजितदादा पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजितदादा गटाच्या सत्तेतील सहभागामुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. तसेच अजितदादा गटातील मंत्र्यांच्या शपथविधीला आठ दिवस झाले, तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे दुहेरी संकट आहे. अशातच आता भाजपच्या तीन ते चार मंत्र्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय महाभूकंप होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या महायुतीत येण्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर त्यांच्या खातेवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता असून आताचे जे मोठे मंत्री आहेत, त्यांना राजीनामा द्यायला सांगितले जाऊ शकते. यामध्ये भाजपच्या देखील काही मंत्र्यांचा समावेश आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांना श्रीधर नाईक खुन खटल्यातील प्रमुख आरोपीकडून धमकी…!

news

बेरोजगार तरुणांसाठी छत्तीसगड राज्य सरकारचा एक मोठा निर्णय….

news

तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार पंचायत समिती निवडणुकित उमेदवार उतरवणार..

news

Leave a Comment