स्टोरी

जिल्हा बँकेची दादागिरी सहन करणार नाही जशास तसे उत्तर देऊ! संदीप जगताप यांचा इशारा….

Spread the love

२६ मे वार्ता: जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हा बँक कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांची दोन तास बैठक जिल्हा बँकेच्या ऑफिसमध्ये पार पडली. सध्या महिला पथकाकडून शेतकऱ्यांना अपमानित करण्याचे काम सुरू आहे. आज पर्यंत सहन केले, इथून पुढे जर महिला पथकाने शेतकऱ्यांना अपमानित केले तर शेतकऱ्यांच्या घरातील महिला त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्टपणे प्रशासक चव्हाण यांना संदीप जगताप यानी सुनावले. तसेच नवीन ओटीएस योजना दिल्याशिवाय बँक वाचणार नाही यासाठी कृती समिती शासन स्तरावर प्रयत्न करते आहे. जिल्हा बँकने देखील केलेल्या प्रयत्नाचा चव्हाण यानी शेतकरी नेत्यांपुढे या बैठकीत लेखा जोखा मांडला. बँक वाचवण्यासाठी चांगले मार्ग बँक शोधत असल्यास त्यास कृती समिती साथ देईल. व गरीब शेतकऱ्यांवर दादागिरी केल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ. असा इशारा आज कृती समीतीने दिला. तसेच कृती समीतीने लवकर नवीन ots योजना देण्याचा आग्रह धरला. तसेच या दरम्यान दूरध्वनी वरून राजु शेट्टी यांनी देखील प्रशासक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. व राज्य बँके कडून कमी व्याजाने दीर्घकालीन कर्ज घेऊन शेतकऱ्यांना ots देण्याची चव्हाण सूचना केली.

जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना श्री संदीप जगताप

गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्हा बँकेने सामान्य शेतकऱ्यांकडे महिला पथक वसुलीसाठी पाठवून शेतकऱ्यांना अपमानित करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. शेतकरी महिलांचा सन्मान करतात याचा गैरफायदा जिल्हा बँक घेत आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही. जे आवाजावी व्याज शेतकऱ्यांना लावले आहे ते शेतकरी भरणार नाही. शेतकऱ्यांना कर्ज भरायचे आहे. परंतु योग्य व्याजदराचे आकारणी करून ओटीएस योजना द्यावी. ही मागणी आणि प्रशासक चव्हाण यांच्याकडे केली. जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि बँकेने वसुलीसाठी गरीब शेतकऱ्यांना त्रास देणं सुरू ठेवले. तर मात्र जिल्ह्यामध्ये संघर्ष अटळ आहे.

संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


Spread the love

Related posts

एसटी आगारप्रमुख मिळावा यासाठीचे उद्या असलेले आंदोलन मनाई आदेश संपेपर्यंत स्थगित! योगेश धुरी

news

मृत श्री सदस्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला!धक्कादायक माहिती

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य परंपरा मोठी आहे…! श्री विकास सावंत

news

Leave a Comment