स्टोरी

प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडीत रुदय सत्कार.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): कुडाळ मालवणच्या नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आपल्या पुढील सेवेसाठी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणेवाडी येथे आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळा आगणे यांनी सर्वांचे यथोचित स्वागत करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन श्रीमती ऐश्वर्या कळुसे यांचा हृदय सत्कार केला. यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाल्यात श्री देवी भराडी मातेचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठे असून लोकाभिमुख सेवा या जिल्ह्यात करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आज आंगणे कुटुंबीयांचे हे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहे.याबरोबर प्रथमच नूतन मंडळ अधिकारी झालेल्या श्रीमती एम एस चव्हाण यांचाही हृदय सत्कार आंगणे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी तलाठी ए. के. देसाई, ग्रामसेवक युगल प्रभू देसाई, आंगणेवाडी विकास मंडळाचे सेक्रेटरी मधुकर आंगणे, बाबू आंगणे, अनंत आंगणे, चंद्रकांत आंगणे, सुरेश आगणे, सतीश आगणे, सुधाकर आगणे, रघुनाथ आंगणे, संदेश आ, श्री वराडकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी बाळा आंगणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन.. आंगणेवाडी येथे नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळुसे यांचा सत्कार करताना श्री बाळा आंगणे सोबत मान्यवर.


Spread the love

Related posts

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण.

news

पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर अनेक वाहनं एकमेकांना धडकून विचित्र अपघात

news

अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच!

news

Leave a Comment