स्टोरी

चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे! ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सध्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून देशात वाद सुरू आहे. भाजपाशासित राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत महिलांचा आकडा ३ आहे, तरी ३२ हजार करून दाखवण्यात आला. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे,” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

ट्वीट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपटाने हा खोटारडेपणाचं परमोच्च स्थान गाठलं आहे. केरळची सत्य परिस्थिती वेगळीच आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. गेल्यावर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले होते. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, भारताचा ७६ टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ०.७६ टक्के आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के तर, उत्तर प्रदेशमध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.


Spread the love

Related posts

मसुरे बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..!

ओझर विद्यामंदिर येथे गुरु पूर्णिमा उत्सव साजरा!

news

मुणगे येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा संगीतकार भार्गव लब्दे यांचे निधन..

news

Leave a Comment