स्टोरी

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल

Spread the love

शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? असा प्रश्न करत भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जात असल्याची घणाघाती हल्ला ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

भाजपच्या जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपने त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आम्हीही ३० वर्ष सापाला दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावर फुत्कारत आहे. अशी जहरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. जेव्हा आपला जीव धोक्यात असतो तेव्हाच साप चावतो. पण दुष्य माणूस पावलोपावली तुमचे नुकसान करत असोत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलेच पाहिजे. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, असंच खरगे यांना म्हणायचे आहे, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

धाकोरे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन…!

news

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण.

news

श्रीहरीकोटामधून चंद्रयान-३ चं यशस्वी लॉन्च!

news

Leave a Comment