स्टोरी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण.

Spread the love

मालवण प्रतिनिधी: मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षानी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं की, पहिल्यापेक्षा भव्य आणि टीकणारा पुतळा उभारण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी सांगितल्याप्रमाणे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आता नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पूर्ण झाला आहे. पहिल्यापेक्षा आकर्षक आणि वजनदार पुतळा उभाराण्यात आला आहे.

 

नव्याने उभारण्यात येणाऱ्या शिवरायांचा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनविण्यात आला आहे. पुतळ्याच्या उभारणीत डुप्लेक्स स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झ धातू वापरला जातोय. त्यामुळे हा पुतळा वर्षानुवर्षे टिकेल असं शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितलं आहे. हा पुतळा बघण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ मे ला सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर आहेत.  यादरम्यान राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

 


Spread the love

Related posts

राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज चिन्मय पादुका सुवर्णमहोत्सव जल्लोषात संपन्न! 

news

इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक मोदी सरकारच्या महत्वाच्या सूचना जारी

news

संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हलच्या वतीने भारतीय चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून नियुक्ती.

news

Leave a Comment