राजकारण

बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत! उद्धव ठाकरे

Spread the love

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी होणार नसेल, तर मिधेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आज मंगळवार दि. ११ एप्रिल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

काय म्हणाले उद्धव ठाकरे? आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचर होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत. आता हे कुणाला जोडे मारणार आहेत की स्वतःच जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत? कारण ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत. त्यांनी काय चाटायचं ते चाटावं, आम्ही बघायलाही येणार नाही. मात्र, एवढं बोलल्यावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. असं उद्धव ठाकरे म्हणाले.


Spread the love

Related posts

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आगामी काळात सत्तेत दिसतील! भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये

news

“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जरी नामांतर झालं”; उद्धव ठाकरेंना उद्देशून संजय शिरसाटाचं विधान!

news

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची आज दुपारी ३ वाजता माणगावात जाहिर प्रचार सभा.

news

Leave a Comment