राजकारण

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची आज दुपारी ३ वाजता माणगावात जाहिर प्रचार सभा.

Spread the love

सिंधुदुर्ग: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची भव्य जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालय येथे हि प्रचार सभा होणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकणच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नितीन बानुगडे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी जाहिर सभेस शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू याच्या अटके नंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक!

news

अवकाळी पाऊस, कर्मचाऱ्यांचा संप याबाबत सरकारला गांभीर्य आहे की नाही?- अजित पवार

news

शिवसेना मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त, उपाध्यक्षपदी सिया धुरी तर सचिव पदी अविराज परब यांची नियुक्ती..

news

Leave a Comment