स्टोरी

अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताहाची विविध उपक्रमाने सांगता.

Spread the love

कुडाळ वार्ताहर: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा उज्वला येळावीकर. यांच्या उपस्थिती जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आरोग्य तपासणी कुडाळ तालुक्यातील पूर्ण प्राथमिक पांडुरंग शेठ पडते (पडतेवाडी)शाळेत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा उज्वला येळावीकर यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रेयश परब, डॉ. मुक्ता दुधगावकर तसेच नर्स विन्या नार्वेकर आणि फार्मासिस्ट विवेक आंगणे यांच्या टीमने विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली.यावेळी सौ. उज्वला येळावीकर यांनी उत्तम आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी व आरोग्य जनजागृतीचे महत्व अधोरेखित केले. मुलांना आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सोपे सोपे नियम सांगितले आणि नियमित व्यायामावर भर देण्यास सांगितलें.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष उज्वला येळावीकर यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील हुमरट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्या स्नेहा महाडिक यांनी शेतकरी महिलांना सुपारीच्या रोपांचे वाटप केले. यावेळी माजी सरपंच शरीफहा काझी उपस्थित होत्या. ज्येष्ठांना भेट वस्तू स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताहची सांगता करतांना आनंद सेवा ट्रस्ट पिंगुळी येथे वय वर्षे 70 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा उज्वला येळावीकर यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.


Spread the love

Related posts

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

news

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून घेण्यात आलेला कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न.

news

हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न!

news

Leave a Comment