स्टोरी

बी एल ए यांनी सतर्क राहून कामकाज करा..! काका कुडाळकर; शिवसेनेची आढावा बैठक मसुरेत संपन्न.

Spread the love

.मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथे छोटू ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुरे विभाग शिवसेना या पक्षाच्या वतीने बी.एल. ए. (Booth Level Agent) संदर्भात आढावा बैठक नुकतेच पार पडली.यावेळी काका कुडाळकर यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करताना त्यांनी बी.एल. ए. ची गरज, मतदार यादी, पुनरीक्षणातील भूमिका, पक्ष संघटनेसाठी त्याचे महत्त्व तसेच आगामी पक्ष धोरणे आणि त्याचे गांभीर्य अतिशय स्पष्टपणे समजावून सांगितले.बी.एल. ए. यांनी सुद्धा कशा पद्धतीने काम केले पाहिजे याबाबतही सविस्तरपणे माहिती दिली. सर्व बी एल ए यांनी सतर्क राहून कामकाज करा असे आवाहनही त्यांनी आढावा बैठकीत बोलताना केले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित करून कामकाज संदर्भात माहिती करून घेतली. जिल्हा युवक अध्यक्ष संग्राम साळसकर, तसेच तालुकाध्यक्ष विनायक बाईक यांनी सुद्धा महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, शिंदे शिवसेनेचे युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर,तालुकाप्रमुख विनायक बाईक, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर,विभागीय अध्यक्ष संतोष पालव,पप्पू मुळीक, वेरली सरपंच धनंजय परब, तात्या हिंदळेकर,शिवाजी परब,पुरुषोत्तम शिंगरे, जितेंद्र परब, सतीश मसुरकर, बाबू येसजी,सचिन पाटकर, किशोर ठाकूर, मनोज पालव, महेश बागवे, अनंत भोगले, निलेश मसुरकर, तात्या परब, राजाराम मुळीक, किरण पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बी. एल. ए. उपस्थित होते. छोटू ठाकूर आणि संतोष पालव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले..


Spread the love

Related posts

नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी.

news

ओरोस सावंतवाडा भवानी मंदिर येथील सभामंडपाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण….

news

दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आंगणे कुटुंबीयांकडून आंगणेवाडीत सत्कार..!

news

Leave a Comment