शिक्षण

मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू..! ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

​​मसुरे प्रतिनिधी: मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरू झाली आहे. यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयटीआयने इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.​ इच्छुक विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (admission.dvet.gov.in) ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.​ अर्ज भरल्यानंतर, विद्यार्थ्यांनी जवळच्या आयटीआय केंद्रावर जाऊन आपल्या अर्जाची पडताळणी (व्हॅरिफिकेशन) करणे आवश्यक आहे. पडताळणीनंतरच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी व्यवसायांचे पर्याय सादर करता येतील.​ ही प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता, आरक्षण आणि ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) पार पडणार आहे.​आयटीआय मालवण येथे यंदाच्या प्रवेशासाठी ४ विविध व्यवसायांमध्ये एकूण १३२ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश आहे:१. मेकॅनिक डिझेल२. वेल्डर३. ड्रेस मेकिंग४. रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग टेक्निशियन​ प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह विद्यावेतन योजना, प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अशा विविध योजनांचा लाभ दिला जातो.प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत संस्थेमध्येच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली जात आहे.​​अधिकधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय मालवण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य बी. पी. सोनवणे, प्रभारी प्राचार्य ए. जी. खेडेकर तसेच संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

“पदवीधर शिक्षकांना” वेतन देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढावा..!

प्रसाद परब

चला संविधान समजून घेऊया…! जि.प. शाळा ओसरगाव नंबर १ मध्ये मासूमचा पहिला बालमेळावा उत्साहात

प्रसाद परब

कोकणातून प्रशासकीय अधिकारी घडवणारच!- सत्यवान यशवंत रेडकर

news

Leave a Comment