स्टोरी

शिर्डी येथे तिसऱ्या राज्यस्तरीय काव्यगंध कवी संमेलनामध्ये कवी दीपक तळवडेकर यांच्या “अनुत्साहाच्या वातावरणाच्या काळात ” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन –

Spread the love

शिर्डी: काव्यगंधप्रकाशन अंतर्गत काव्यगंध साहित्य मंच महाराष्ट्र राज्य तिसरे राज्यस्तरीय भव्य कवी संमेलन शिर्डी येथे हॉटेल शांती कमल शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी संमेलनाध्यक्ष माननीय बाबासाहेब सौदागर प्रसिद्ध चित्रपट गीतकार, चरित्र अभिनेते, निसर्ग कवी, पटकथा, संवाद लेखक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास माननीय बाळासाहेब गिरी सुप्रसिद्ध गझकार निवेदक नाशिक, माननीय हेमलता गीते सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका अहिल्यानगर ,माननीय भारत सातपुते प्रसिद्ध लेखक कवी निवेदक लातूर, माननीय अमोल चिने कवी व्याख्याते नाशिक, माननीय गजानन उफाडे कवी निवेदक पुणे ,माननीय रज्जाक शेख कवी गझलकार श्रीरामपूर, माननीय सुमनताई मुठे कवयित्री नाशिक, माननीय डॉक्टर श्रद्धा वाशिमकर नागपूर, डॉक्टर सुशील सातपुते कवी छत्रपती संभाजीनगर ,माननीय प्राध्यापक जयश्री वाघ कवयित्री भंडारा, इत्यादींची प्रमुख उपस्थिती या कवी संमेलनास लाभलेली होती.

या साहित्य सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या तब्बल ७५ कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले .सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगलेल्या या काव्य मैफिलीत प्रेम, निसर्ग, समाज व्यवस्था, ग्रामीण जीवन, स्त्रीशक्ती आणि मानवी भावभावना अशा विविध विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या या कवी संमेलनामध्ये सिंधुदुर्गातील कवी दीपक तळवडेकर यांनी ‘होता तुम्ही भीमबाबा’ ही कविता सादर केली यावेळी प्रमुख उपस्थित माननीय रज्जाक शेख कवी गझलकार श्रीरामपूर यांनी कवितेची दखल घेत स्तुती केली मान्यवरांनी आपल्या मनोगतात काव्यगंध साहित्य समूहाच्या साहित्यिक विषयक कार्याचे कौतुक केले या कवी संमेलनामध्ये ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

या कवी संमेलनामध्ये सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे गावातील प्रसिद्ध कवी दीपक तळवडेकर यांच्या “अनुत्साहाच्या वातावरणाच्या काळात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष माननीय बाळासाहेब सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले .या संमेलनाचे आयोजन काव्यगंध साहित्य मंचच्या संस्थापिका ॲड .अक्षशीला शिंदे आणि प्रकाशक प्रशांत गोरे यांनी केले .उपस्थितीतांचे आभार प्रशांत गोरे यांनी मानले.


Spread the love

Related posts

कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्स्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न.

news

इयत्ता दहावीच्या वर्षांत आई–वडिलांचा अपघात , आईचे निधन..! तरीही जुळ्या बहिणींचे नेत्रदीपक यश

news

कुडाळ येथे आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

प्रसाद परब

Leave a Comment