स्टोरी

कुडाळ येथे आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास दहा ग्रंथालयाने शतक दीड शतक पूर्ण केले आहे. अशा ग्रंथालयांचा सन्मान करण्यात आला. पुढील वर्षी निश्चितपणे ज्या ग्रंथालयांना ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या ग्रंथालयांचाही सन्मान केला जाईल. जिल्ह्यात शतकोत्तर काळापासून ग्रंथालय चळवळ वाढवण्याचे काम केले जात आहे. हे कौतुकास्पद आहे. सर्व ग्रंथालय उत्तमरीत्या काम करत आहेत. आता नव्या तंत्रज्ञानानुसार बदलत्या वाचकानुसार आपल्याला आता बदलायला हवे आणि त्या दृष्टीने ही बदलाची नांदी आहे त्यासाठी आपण सर्वांनी आता निर्धार करूया. वाचक ग्रंथालयापर्यंत कसा येईल? यासाठी ग्रंथपाल यांनी आता त्या दृष्टीने कार्यरत राहिला हवे. अशा शब्दात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ गेले दोन दिवस कुडाळ येथे भरवण्यात आले आहेत. या ग्रंथोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने सर्वांनी निर्धार केला. वाचक वर्ग अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने ग्रंथपाल यांनी चर्चासत्रात ग्रंथपाल हाच ग्रंथालयांचा दुवा आहे. त्यानेच आता वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्याच्या दृष्टीने आपल्यात बदल करायला हवा. असे मत व्यक्त केले. शासनाने ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी कडे लक्ष देण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉल येथे २७ व २८ मार्च या दोन दिवसात सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव भरवण्यात आला होता. या ग्रंथोत्सवाला साहित्यिक वाचक ग्रंथालय कर्मचारी यांनी सहभाग दर्शवला. या ग्रंथोत्सवाचा समारोप जिल्ह्यातील दहा शतायु ग्रंथालयांचा सन्मान करून करण्यात आला.

यावेळी कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी वाचनालय, सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर, वेंगुर्ले नगर वाचनालय, शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय, होडावडे श्रीराम वाचनालय, बांदा नट वाचनालय, मालवण नगर वाचनालय, मंदिर आचरा श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, मालवण भरड शिवाजी वाचन मंदिर, वाडे देवगड सौ मालती जनार्दन जोशी मोफत वाचनालय, व डॉ. वि. वा. नेने ग्रंथालय या ग्रंथालयांच्या संस्थाचालक व ग्रंथालय कर्मचारी यांचा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी समारोप कार्यक्रमाला बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हजारे म्हणाले गेले दोन दिवस जिल्हा ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून एक वाचन चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी हातभार लावला या जिल्ह्यात सर्व ग्रंथालय उत्तमरीत्या काम करत आहेत. परंतु नव्या बदलला नुसार आपण आता बदलायला हवे आणि वाचक आपल्याकडेच कसे वळतील? या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे. असं ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष स्थानावर बोलताना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले या जिल्ह्यात जिल्हा ग्रंथालय कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय संघ यांनी संयुक्तरित्या एकत्रित ग्रंथोत्सव भरवला. या ग्रंथोत्सवात शतायु ग्रंथालयांचा सत्कार करण्यात आला. पुढच्या वर्षी ५० वर्ष ज्या ग्रंथालयांना पूर्ण झाली आहेत. त्यांचाही सन्मान केला जाईल.

यावेळी राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य व श्रीरामाचे मंदिर चे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी ग्रंथालय चळवळ वाढीच्या दृष्टीने निश्चितपणे शतायु ग्रंथालयांचा सन्मान केला. ही चांगली बाब आहे. अशा शब्दात गौरव उद्गार काढले. यावेळी अरविंद शिरसाट यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वाचन संस्कृती वाढ होण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका या विषयावर राज्यस्तरीय ग्रंथपाल पुरस्कार विजेते संजय शिंदे, ग्रंथपाल पूनम नाईक, प्रंतपाल अक्षता सावंत, ग्रंथपाल सिद्धेश राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ व्यापकतेने सुरू आहे. ग्रंथपाल हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा भाग आहे. आता ग्रंथपालाने नव्या बदलत्या स्वरूपानुसार वाचक वर्ग ग्रंथालयापर्यंत कसा येईल? यासाठी नवनवीन बदल स्वीकारायला हवेत. अशी मते व्यक्त केली. यावेळी आनंद यात्रा मध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी ग्रंथालयासंदर्भात आणि एकंदरीत वाचन संस्कृती याविषयी आपले मत व्यक्त केले आणि आनंद यात्रेच्या माध्यमातून ग्रंथोत्सवाला जान प्राप्त करून दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन पांचाळ सर, आभार प्रतिभा पाटणकर यांनी केले. ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक सतीश गावडे, गुरुनाथ मडवळ, ॲड संतोष सावंत, राजन पांचाळ, जयेंद्र तळेकर, संजय शिंदे, रुचिता केळकर, धाकु तानावडे, डॉक्टर विवेक पाटणकर, कैलास पवार, प्रसाद जाधव, किशोर कांबळे, सागर भोसले, हेमंत शिरसाठ वैभव कोरगावकर प्रियल रणसिंग नितीन कुडाळकर बापू सावंत, स्वप्नाली आजगावकर आदींनी सहकार्य केले.


Spread the love

Related posts

मसुरे मध्ये माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा अनोखा सन्मान….

news

नागोठणे येथे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गा’चे संतांच्या हस्ते अनावरण!

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती बाप्पाच्या बॅनरांची दुरावस्था!

news

Leave a Comment