स्टोरी

“अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग”च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांची भेट घेत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.

Spread the love

सिंधुदुर्ग (म. ल. देसाई): शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मान. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष शिक्षण सभापती यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. भेटी प्रसंगी अतिरिक्त शिक्षक समायोजन बाबत सकारात्मक चर्चा केली. तसेच संचमान्यता, क्रीडा स्पर्धा, समूह गायन समूह नृत्य स्पर्धा, APJ अब्दुल कलाम परीक्षा आयोजन तसेच गेल्या वर्षी APJ अब्दुल कलाम परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या मुलांच्या इस्रो दौऱ्याबाबत चर्चा केली. केवळ उद्याच्या स्पर्धा होतील, इतर कोणत्याही स्पर्धा घेणे शक्य नाही. तसेच आता इस्रो दौरा रद्द करण्यात आलेला आहे अशी प्रशासनाची भूमिका होती. परंतु कोणत्याही परिस्थितीत समूह गायन, समूह नृत्य स्पर्धा झाल्याच पाहिजेत, मुलांनी खूप मेहनत केलेली आहे, शाळा, समाज, पालक यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे त्यामुळे या स्पर्धा घ्याव्याच लागतील.असा आग्रह आम्ही धरला.

तसेच विमान प्रवासाची संधी ग्रामीण भागातील गरीब पालकांच्या मुलांना या इस्रो दौऱ्यामुळे मिळते. रात्रंदिवस मुले मेहनत करतात. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढते आहे असे अनेक मुद्दे आम्ही मांडले. शेवटी शिक्षण सभापती आदरणीय श्री प्रितेश राऊळ यांनी आमचे म्हणणे योग्य असल्याने दोन्ही उपक्रम घेतले जातील. अशी ग्वाही दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय श्री. जयप्रकाश परब साहेब यांनी सकारात्मकता दाखवली. खरे म्हणजे आदरणीय परब साहेब यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी घेतल्यापासून खूप वेगाने कामे मार्गी लागत आहेत. मागील दोन वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे. त्याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे आभार मानले.

सदर भेटीच्या वेळी सदर भेटीच्या वेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म . ल .देसाई तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण वळवी, सचिव महेश पालव माजी अध्यक्ष राजाराम कविटकर माजी सचिव बाबाजी झेंडे तसेच उपाध्यक्ष दत्ता सावंत ,सुरेंद्र विंरनोडकर कदम संतोष मराठे सर श्रीकृष्ण ठाकूर, तालुका अध्यक्ष विजय गावडे यल्लाप्पा दळवी, दिनकर केळकर , तेजस बांदिवडेकर, प्रभाकर पावसकर तालुका सचिव विजय धामापूरकर, रुपेश परब, केसरकर, राजेंद्र पाटील, संतोष देसाई राजेंद्र चव्हाण ,दिपक राऊळ, गणेश घाडी, दत्ताराम सावंत तसेच महिला सेल अध्यक्ष तेजस्विता वेंगुर्लेकर ,सचिव माळी मॅडम ,माजी अध्यक्ष सुमेधा वारंग ,मेस्त्री मॅडम इत्यादी पदाधिकारी व इतर जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते.

आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष, आदरणीय उपाध्यक्ष, आदरणीय शिक्षण सभापती यांनी प्रत्येक विषयात आमची बाजू लावून धरली त्याबद्दल त्यांचेही आभार. या भेटी प्रसंगी उपस्थित सर्व संघटना राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी यांचेही आभार. आज बऱ्यापैकी महिला भगिनी उपस्थित होत्या त्यांचेही आभार मानले. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे संघर्षाला बळ येते. आधार वाटतो.

अध्यक्ष -सरचिटणीस: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग


Spread the love

Related posts

सकल मराठा समाजाच्या लढ्यासाठी सावंतवाडी संस्थान पूर्ण सहकार्य करणार…!

news

तुळस पलतड येथील त्या धोकादायक दरडी च्या ठिकाणी असलेल्या ४ घरातील ११ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थानांतर

news

दूहेरी खूनातील आरोपीला जामीन मंजुर!

news

Leave a Comment