क्राईम

नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार खटल्याची आज शुक्रवारपासून दररोज ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे न्यायालयाचे आदेश.

Spread the love

नसरापूर: नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुणे येथील न्यायालयात काल गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आलेआहेत. या प्रकरणात दाखल आरोपपत्र आणि आरोपीविरोधातील पुरावे आरोप निश्चित करण्यासाठी भक्कम असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्याची आजपासून शुक्रवार दररोज इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपी मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा वैद्यकीय अहवाल आणि या खटल्यातील एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आली.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याला गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने १ मे रोजी दुपारी ३:०० ते ४:०० च्या सुमारास चिमुकलीला गाठीशेव देतो आणि गाईचे वासरू दाखवतो, असे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिला गोठ्याशेजारच्या शेडमध्ये नेऊन अत्याचार केला. तिच्या तोंडात बोळा कोंबून छातीवर मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर तिचं शव लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा घटनाक्रम विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितला.

आरोपी पीडित मुलीला घेऊन जात असल्याचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात दिसत आहे. आरोपी आणि पीडितेला एकत्र पाहणाऱ्या लहान मुले आणि ग्रामस्थांनी पोलिस व न्यायालयासमोर जबाब नोंदविले आहेत. ओळख परेडमध्ये साक्षीदारांनी आरोपीला ओळखले आहे. आरोपी लैंगिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय अहवाल, ‘डीएनए’ चाचणी व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीच्या कबुलीजबाबावरून हस्तगत मुद्देमाल आदी पुरावे आणि एकूण ८२ साक्षीदारांची यादी त्यांनी न्यायालयात सादर केली.

विधी साह्य संरक्षण वकील हिंमतराव सूर्यवंशी यांनी आरोपीची बाजू मांडली. अपहरण, विनयभंग आणि खून सिद्ध करण्याइतका ठोस पुरावा आरोपपत्रात नाही; तसेच ‘लास्ट सीन टुगेदर’ व न्यायवैद्यक पुरावेही योग्य नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याइतका प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे नमूद केले आहे. आरोपीला आरोप वाचून दाखवण्यात आले असता त्याने ते नाकारले. त्यामुळे न्यायालयाने या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार कलम १३७ (२) (अपहरण), १४० (१) (अपहरण करून खून), कलम ६४ (अत्याचारासाठी शिक्षा), ६५ (२) (बारा वर्षांखालील मुलीवर अत्याचार), कलम १०३ (१) (खून), कलम ७४ (विनयभंग) आणि अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) चार, पाच, सात, अकरा आणि बारा या कलमांनुसार आरोप निश्चित करण्यात आले.


Spread the love

Related posts

गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर!

news

दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या प्रसाद लोक यांच्या पत्नीने केली आत्महत्या.

news

जणू लाच घेणे हा आमचा अधिकारच आहे!७ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या वरळी आरे दुग्दुधशाळा विभागाच्या साहाय्यक व्यवस्थापकांना अटक!

news

Leave a Comment