स्टोरी

कोल्हापूरच्या कन्हेरी मठास नगरसेवक महेश इंगळे यांची सदीच्छा भेट.

Spread the love

कोल्हापूर: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी रविवारी नियोजीत कोल्हापूर दौऱ्याच्या माध्यमातून मित्र परीवारासमवेत कोल्हापूर येथील कन्हेरी मठास सदीच्छा भेट दिली. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी श्री काड सिद्धेश्वर महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.यावेळी महेश इंगळे यांनी कणेरी मठाच्या मुर्त स्वरूपातील ग्रामीण जीवनशैली पाहणी केली व उपस्थित भक्तांच्या वतीने मठाची व तेथील समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन स्तुती केली.

यावेळी कणेरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक महेश सुधाकर लंबे, प्रा.शिवशरण अचलेर सर, अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ,श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सागर गोंडाळ, श्रीकांत झिपरे, मनोज जगताप सर, विश्वनाथ देवरमनी सर, कुमार हत्तुरे,कलशेट्टी सर, विद्याधर गुरव सर, रमेश शिंदे सर, सुनिल पवार, काका सुतार, सुरेश वाले सर, ओमकार उटगे, स्वामीनाथ मुसळे, अमर पाटील, संदीप पंडीत, नामदेव माने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

खड्ड्यांना उत्तरदायी ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करा!

news

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा!

news

दिड महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील रस्त्यांची वर्कऑर्डर कधी होणार?- उदय दुखंडे…!

news

Leave a Comment