क्राईम

२८ लाख रुपयांची लाच घेतांना पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना ACB कडून अटक.

Spread the love

पुणे: पुणे पोलीस आयुक्तालय २८ लाखांच्या लाचप्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने तब्बल ₹२८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. एकीकडे देशात महिला राष्ट्रपती पदांवर पोहोचून उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. मात्र दुसरीकडे पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार सारख्या महिला त्या अभिमानाला तडा देणाऱ्या ठरत आहेत. वैशाली तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात पीआय बदली झाली होती. त्या पुणे शहर पोलीस दलात एपीआय पदावर कार्यरत होत्या. मात्र, बदलीमुळे त्यांना कालच कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यांची बदली होऊनही पुण्यातील फाईल्सचा मोह त्यांना आवरता आला नसल्याने हि घटना घडली आहे. पोलिस आयुक्तालयासारख्या संवेदनशील ठिकाणी इतकी मोठी रक्कम स्वीकारण्याची हिंमत वैशाली तोटेवार या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवल्याने एसीबीचे अधिकारीही हादरले गेले आहेत.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली तोटेवार यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेत असताना काही तक्रार अर्ज चौकशीसाठी सोपवण्यात आले होते. आठ ते दहा तक्रार अर्जाची चौकशी त्यांच्याकडे होती. त्यापैकी एका प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. अर्जाची चौकशी तक्रारदाराच्या बाजूने करून त्यातील गैर अर्जदार यांच्या विरुद्ध कारवाई करून तक्रारदाराची जमीन त्यांना परत मिळून देण्यासाठी ही लाच तोटेवार यांनी मागितली होती. सुरुवातीला तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित २८ लाखांची मागणी करण्यात आली.


Spread the love

Related posts

बारावीच्या परीक्षेच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल.

news

भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ! आरोपीला पोलिसांनी केली अटक….

news

प्रेयसीच्या नादात पोलिसाची आत्महत्या?

news

Leave a Comment