क्राईम

बारावीच्या परीक्षेच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल.

Spread the love

२६ मे वार्ता: बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोनच हस्ताक्षरांमध्ये लिखाण असल्याचे चौकशीत समोर आले होते. अखेर बोर्डाने या प्रकरणाचा शोध लावला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकेत एकच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. हे दोघे प्राध्यापक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उसारे राहुल भगवानसिंग (रा पिंपळा ता. सोयगाव), मनीषा भागवत शिंदे (रा. धनवट ता.सोयगाव) असे आरोपींची नावं आहेत. सोयगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी असलेले रंगनाथ रेवबा आढाव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणात बोर्डाने एक चौकशी समिती नेमली होती. दरम्यान यावेळी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील या उत्तरपत्रिका असल्याचे समोर आले. पण दुसरे हस्ताक्षर कोणाचे याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशी अंती समितीने उसारे राहुल भगवानसिंग आणि मनीषा भागवत शिंदे या दोन्ही प्राध्यापकांना दोषी ठरविल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍याला लाच घेतांना अटक!

news

हुती दहशतवाद्यांकडून भारताच्या मालवाहू जहाजाचे अपहरण….

news

भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ! आरोपीला पोलिसांनी केली अटक….

news

Leave a Comment