क्राईम

नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍याला लाच घेतांना अटक!

Spread the love

लाचखोर सुनीता धनगर यांच्याकडे ८५ लाखांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले.

नाशिक: नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (‘एसीबी’च्या) पथकाने अटक केली आहे. त्यांच्यासमवेत कर्मचारी नितीन जोशी यांनाही ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे. ‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.


Spread the love

Related posts

परीक्षा परिषदेच्‍या प्रभारी आयुक्‍त शैलजा दराडे निलंबित!

news

४ हजार शेळ्या-मेंढ्यांची बोटीतून वाहतूक! १६ जणांना केली अटक.

news

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई!

news

Leave a Comment