क्राईम

बलात्कार प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर…! आरोपीच्या वतीने अॅड. स्वप्नील कोलंगावकर यांनी काम पाहिले.

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील मळेवाड-शेडवली परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी लघुशंकेसाठी घराबाहेर आली असता आरोपीने तिला जबरदस्तीने झोपडीत ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७०, ७४, ३५२, ६४(१) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक २ विकेंद्र उर्फ बिकेंदर गुलू लोहारा याने जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस १५ हजार रुपयांच्या जामिनावर व काही अटींसह मुक्त करण्याचे आदेश दिले.या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. स्वप्नील बबन कोलंगावकर यांनी काम पाहिले.


Spread the love

Related posts

पाकिस्तानात हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार.

news

आंबेगाव येथून आपल्या मालकीचे बैल नातेवाईकांकडे सासरवाडीला चौकुळ येथे नेत असतांना जानू फाले यांना अज्ञात व्यक्तीकडून बेदम मारहाण.

news

दिल्ली येथील बेपत्ता मुलगी प्रकरणी वेंगुर्ला येथील जावेद मकानदार सह आणखी एकाचा सहभाग!

news

Leave a Comment