स्टोरी

साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर – दोडामार्ग संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान.

Spread the love

दोडामार्ग प्रतिनिधी: समाजातील तळागाळात गाव ते सामाजिक विकास प्रक्रियेत हातभार लावणाऱ्या व्यक्तीमत्व यांचा साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटना कोलझर – दोडामार्ग यांनी शोध घेऊन त्यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्याचे ठरविले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तीचा हा सन्मान सोहळा पुरस्कार सोहळा १९ मे रोजी होणार आहे. या पुरस्कार व्यक्तींच्या नावांची घोषणा अध्यक्ष -साबाजी सावंत सचिव सौ.-धारिणी देसाई, उपाद्यक्ष श्रीम – मंदोदरी देसाई व संघटनेचे सर्व संचालक यांनी केली आहे. साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर – दोडामार्ग ही संघटना तालुक्यात सामाजिक उपक्रम घेण्यात नेहमी पुढे असते. अशावेळी समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरवही संस्था करीत असते.

यावर्षीचे क्षेत्रनिहाय पुरस्कार असे आहेत. श्री- एकनाथ नाडकर्णी, श्री विकास कुलकर्णी, ॲड संतोष सावंत जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव, संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी तसेच सौ अस्मिता भोसले (भोसले पॉलिटेक्निक अध्यक्षा), श्रीम. डॉ दिव्या गवस (दोडामार्ग), श्री दिवाकर देसाई ( सिंधुदुर्ग जिल्हा बँक CEO ओरोस), श्री.वैभव साळकर (पत्रकार दोडामार्ग), श्री.तातोबा वामनराव देसाई (कोलझर सोसायटी चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते तथा पोलीस पाटील), श्री. अरुण पवार ( मुख्याध्यापक जि. प. शाळा कोलझर) श्री. सुरेंद्र सावंत ( तळकट सरपंच), श्री. सागर जयसिंग राणे( सामाजिक कार्यकर्ते रेडी), ताहिरा मुजीब अहमद सनदी ( इकरा कॉम्प्युटर सावंतवाडी), श्री. साईनाथ शंकर डांगी (सामाजिक कार्यकर्ते भेडशी), सौ. यशोदा हरिश्चंद्र दळवी (आशा सेविका कोलझर) यांचा समावेश असल्याचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी सांगितले.

दिवाकर देसाई (सिधुदुर्ग जिल्हा बँक सि.ई. ओ.)
श्रीम. यशोदा हरिश्चंद्र दळवी (आशा स्वयंसेविका)
साईनाथ शंकर डांगी (सामाजिक कार्यकर्ते भेडशी)
वैभव साळकर (पत्रकार -दोडामार्ग)
Vikas Kulkarni qualifications: MSW Programme head : Voluntary health association of goa
ताहिरा मुजीब अहमद सनदी (सावंतवाडी माजगाव ईकरा कॉपीटर च्या व्यवस्थापिका)


Spread the love

Related posts

चांद्रयान-३ चे १२ जुलै रोजी प्रक्षेपण होणार!

news

चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे! ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

news

अन पिल्लू आईला बिलगले….! ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण यांची भुतदया….!

news

Leave a Comment