स्टोरी

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे भरधाव बोलेरो गाडीला भीषण अपघात.

Spread the love

सिंधुदुर्ग: आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे भरधाव बोलेरो गाडीलाभीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील संरक्षक कठड्यावर जोरात आदळली आणि त्यानंतर महामार्गावर पलटी झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. योगायोगाने याच महामार्गावरून सिंधुदुर्ग सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गणेश क-हाडकर जात होते. हा अपघात त्यांच्या समोरच झाला असल्याने पोलीस निरीक्षक गणेश क-हाडकर यांनी महामार्गावरिल इतर लोकांच्या मदतीने गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले आणि उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

या अपघातात बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. बोलेरो गाडीचा चालक हा बेसिस्तपणे गाडी चालवत इतर वाहनांना चुकीच्या पद्धतीने ओव्हटॅक करत होता. अशी माहिती घटनास्थळी महामार्गावरील काही वाहन चालकांनी दिली. सिंधुदुर्ग सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गणेश क-हाडकर यांच्या वाहनाला सुद्धा चुकीच्या पद्धतीने ओव्हटॅक करून हा बोलेरो गाडीचा चालक पुढे गेला होता. त्यानंतर काही क्षणातच या गाडीचा अपघात झाला आणि या गाडीच्या मागोमाग येत असलेले पोलीस निरीक्षक गणेश क-हाडकर यांनीच जखमी प्रवाशांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. तसेच अपघाताची इतर चौकशी पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

न्यायालयात पारदर्शकता असायला हवी! सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड

news

आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या विकास निधीतून कल्याण पूर्वेत निर्माण झाले कील्ल्याच्या प्रतिकृतीचे ‘शिवरत्न स्मारक’!

news

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा होणार.

प्रसाद परब

Leave a Comment