स्टोरी

मुंबई शूटिंगबॉल स्पर्धेत खानापूर सांगली संघ विजेता.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सर्कल किंग्ज मित्र मंडळ यांच्या विद्यमाने आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय संघांची खुली शूटिंगबॉल स्पर्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेली होती. राज्यभरातील वीस संघांचा सहभाग होता. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, मालेगाव, सांगली या जिल्ह्या संघानी आपापले कौशल्य दाखवत प्रेक्षकांना खुश केले. या स्पर्धेसाठी विभागीय खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत आणि सर्व दानशूर दाते यांचे आर्थिक सहकार्य लाभले.या राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात खानापूर सांगली संघाने अटीतटीच्या लढतीत संजय भोसले प्रतिष्ठान माळशिरस या संघाचा २५–२२ गुणांनी पराभव करीत सर्कल किंग चषक व रोख तेरा हजार रक्कम मिळवली तर उपविजयी संघाला दहा हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. विजयी संघातून महेश माने, संदेश घारे, नरेश खोत यांनी सुंदर खेळ करतानाच उपविजयी संघातून आमिर काझी यांचे आव्हान परतवून लावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संदेश घारे, बेस्ट शूटर आमिर काझी, बेस्ट नेटमन नरेश खोत यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये पांचवा क्रमांक आरमार विक्रांत संघ, मुंबई; सहावा क्रमांक एम बी पी टी स्पोर्ट्स क्लब, मुंबई; सातवा क्रमांक मुंबई महानगरपालिका क्रीडा मंडळ, मुंबई; आठवा क्रमांक कावेरीनगर पोलिस संघ, पुणे असे विजय प्राप्त केले. स्पर्धेत खेळलेल्या संघातील, आमिर काझी यांच्या संघात सात खेळाडूंपैकी पाच खेळाडू एकाच घरातील होते, त्याची प्रशंसा करण्यात आली. मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत यांच्यामार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत तांत्रिक निरीक्षक प्रफुल्लकांत वाईरकर, नियंत्रक मिलिंद बिर्जे, निरीक्षक प्रदीप (नाना) वाघ यांनी सक्षमपणे जबाबदारी सांभाळली, त्यांना रत्नदीप रावराणे, मंगेश भोसले, अशोक चव्हाण यांची स्पर्धेत पूर्ण वेळ उपस्थित राहून मौलिक साथ लाभली. मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या प्रचलित नियम अटीनुसार व शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार स्पर्धा झाली, सकाळी अकरा वाजता उद्घाटन तर अंतिम सामना व समारोप नेहमीप्रमाने रात्री ठीक साडेदहा वाजता करण्यात आला, मुंबई व्यतिरिक्त कोठेही स्पर्धा उत्तर रात्री समारोप होतो, जेव्हा प्रेक्षक कोणीही नसतात. जिल्यातील खेळाडू जिल्ह्यातच खेळावा या नियम मुंबईतून सुरू झाला, व ते प्रत्येक स्पर्धेत पाहिले जाते. यामागे जिल्हा संघ एकसंघ राहावेत हा हेतू आहे, लॉटरी पद्धतीने ड्रॉ पडण्याचा पायंडा ही मुंबईतच सुरू झाला; स्पर्धेपूर्वी एक दिवस स्पर्धा प्रवेश फी देण्याची अट संघाना घातल्याने संघ येणे निशित केले जाते; यां सर्व गोष्टींसाठी मुंबई हे एक उदाहरण असेल असे दीपक सावंत म्हणाले.

आयोजक सर्कल किंग्ज मित्र मंडळ, विक्रोळी संस्थेचे अध्यक्ष संजय नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद जाधव, गुलजार सय्यद, नितीन राणे, महेश मांजरेकर, राजेश भोर, प्रदीप सरोदे, महेश कदम, गणेश तुपे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी खूपच मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेसाठी पंच /निर्णयाधिकारी म्हणून विजय गोंधळी, मुंबई; सुनील गायकवाड, सातारा; राजेश सोडल, पुणे, अनिल सोनीकर, पुणे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ सुरू होण्यापूर्वी रविवारी दिवंगत झालेल्या आदरणीय ज्येष्ठ, श्रेष्ठ गायिका आशाताई भोसले (मंगेशकर) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पारितोषिक वितरण मुंबई सरचिटणीस दीपक सावंत, राज्य शूटिंगबॉल संघटनेचे सचिव निखिल शेडगे, माजी राष्ट्रीय खेळाडू व नवी मुंबई नगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, आयोजन प्रमुख संजय नाईकनवरे आणि व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.


Spread the love

Related posts

गवा रेड्याच्या ठोकरने मृत्यू झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत द्या…! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वनविभागाकडे मागणी.

news

जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा! पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन!

news

सुदानमधुन आतार्यंत २,१०० भारतीय नागरिक मायदेशी

news

Leave a Comment